• टीव्ही स्क्रीनला स्मार्ट पीसीमध्ये रूपांतरित करा
कोल्हापूर :
संगणक वापरण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी –
रिलायन्स जिओने आज ‘जिओ-पीसी’ हा नवीन क्लाउड-आधारित व्हर्च्युअल डेस्कटॉप प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. याच्या माध्यमातून तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये असलेली टीव्ही स्क्रीन काही क्षणांत हाय-एंड पर्सनल कॉम्प्युटरमध्ये रूपांतरित होऊ शकते. ज्यांच्याकडे जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबर कनेक्शन आहे, त्यांना मासिक सब्स्क्रिप्शन घेऊन ही सेवा वापरता येईल. नवीन वापरकर्त्यांना हा अनुभव पहिल्या महिन्यासाठी मोफत दिला जाईल.
क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात जिओ-पीसी हे भारतातील पहिले ‘पे-एज-यू-गो’ मॉडेल आहे – म्हणजे जितका वापर तितकेच पैसे. या सेवेसाठी कंपनीने कोणताही लॉक-इन कालावधी ठेवलेला नाही. ग्राहकांना मेंटेनन्स किंवा महागडे हार्डवेअर/सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज नाही. फक्त प्लग-इन करा, साइन-इन करा आणि कॉम्प्युटिंग सुरू करा.
कंपनीचा दावा आहे की, जिओ-पीसी एक शक्तिशाली क्लाउड-बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. याची प्रोसेसिंग क्षमता उच्च दर्जाची असून, हे डिव्हाइस गेमिंग, ग्राफिक रेंडरिंगसह दैनंदिन कामांसाठी सहजपणे वापरता येते. अशा क्षमतेचा संगणक बाजारात सुमारे ₹५०,००० ला मिळतो, तर जिओ-पीसीची मासिक योजना फक्त ₹४०० पासून सुरू होते. म्हणजेच ग्राहक एका वर्षात मोठ्या प्रमाणात खर्च वाचवू शकतो. यासोबत वापरकर्त्यांना प्रमुख एआय टूल्स, अॅप्लिकेशन्स आणि ५१२ जीबी क्लाउड स्टोरेज मोफत दिले जाईल.
जगभरातील वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले ‘Adobe Express’ हे डिझाईन व एडिटिंग टूल जिओ-पीसी ग्राहकांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध असेल. यासाठी जिओने Adobe कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
जिओ-पीसी वापरणे अतिशय सोपे आहे. बहुतांश घरांमध्ये जिओ फायबर किंवा एअर फायबरचा सेट-टॉप बॉक्स आधीच टीव्हीला जोडलेला असतो. ग्राहकांना फक्त कीबोर्ड आणि माउस बॉक्सला जोडायचे आहेत. त्यानंतर मुख्य स्क्रीनवर ‘जिओ-पीसी अॅप’ उघडून लॉग-इन करा, आणि जिओ-पीसी वापरण्यास सुरुवात करा.
जिओ-पीसी सुरक्षित क्लाउड कॉम्प्युटिंगचा अनुभव देते. यामध्ये नेटवर्क – स्तरावरील सुरक्षा आहे – व्हायरस, मॅलवेअर आणि हॅकिंगपासून संरक्षित. शॉपिंग, बँकिंग, ऑनलाईन क्लासेस, वर्क फ्रॉम होम, फोटो, व्हिडिओ अशा ग्राहकांच्या सर्व वैयक्तिक माहितीचे क्लाउडमध्ये सुरक्षित संग्रहण होते, जे एका क्लिकवर सहज मिळवता येते. ग्राहक आपली गरज आणि योजना यानुसार क्लाउड स्टोरेज वाढवू शकतो.
जिओने लॉन्च केला एआय रेडी क्लाउड कॉम्प्युटर ‘जिओ-पीसी’
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
28.2
°
C
28.2
°
28.2
°
80 %
8.2kmh
17 %
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°