कोल्हापूर :
येथील मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळच्या श्री साईनाथ मंदिरास ३२ वर्षे पूर्ण होऊन ३३व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त सोमवारी (दि.१४) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री साईनाथ मूर्तीस अभिषेक, आरती व धार्मिक विधी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच महिलांचा हळदी कुंकू, प्रसाद व मोफत वस्तू वाटप समारंभ उत्साहात पार पडला.
श्री साईनाथ मंदिराच्या ३३व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. १४) सकाळी ७:३० वाजता श्रीसाईनाथ मूर्तीस अभिषेक व आरती सौ. स्नेहल व ऋषीकेश पवार यांचे हस्ते करण्यात आली. त्यानंतर सौ. भाग्यश्री व अनिकेत मधुकर चिंचणेकर यांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजा आणि सौ. व श्री. राजेंद्र भिमराव दळवी यांच्या हस्ते होमहवन व शांती आदी धार्मिक विधी झाले.
दुपारी वसंत उर्फ राजू हरिश्चंद्र दुखंडे यांच्या हस्ते आरती झाली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धीरज अनिल पाटील यांची उपस्थिती होती.
वर्धापनदिनानिमित्त शाहीर दिलीप सावंत, भारत चव्हाण, लक्ष्मण गणपतराव पोवार, कु. सिद्धी रविंद्र शेळके, कु. समृद्धी शिवाजी पाटील व अनिल शिवाजी पाटील या विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दुपारी चार वाजता महिलांचा हळदी कुंकू, प्रसाद व मोफत वस्तू वाटप समारंभ उत्साहात पार पडला. रात्री ८:३० वाजता दिलीप टिपुगडे व चंद्रकांत टिपुगडे यांचे हस्ते
आरती झाली. रात्री ९:३० वाजता श्री साईकृपा भारूड व भजन मंडळ यांच्या
भजन कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष गजानन यादव, राजेंद दळवी, सौ. व श्री. अशोक महामुनी, नेताजी भोकरे, अनिल पाटील, दत्ता हुजरे, संजय पाटील, शिवाजी दळवी, प्रवीण फडतरे, अविनाश शिंदे, अजित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थव पाटील, आशिष पाटील, नितीन खोत,
रोहित मोहिते, आनंदा मेहंदळकर, राज पोवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.
——————————————————-
लेटेस्ट तरुण मंडळच्या साईनाथ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

