कोल्हापूर :
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ही वाढत्या वयोमानानुसार पुरुषांमध्ये आढळणारी आरोग्य समस्या आहे. या समस्येमुळे मुख्यत: लघवी संबंधित त्रास जाणवतात. याबाबत संपूर्ण मार्गदर्शन आणि उपचार शिबीर दर मंगळवारी डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रोस्टेट ही एक लहान ग्रंथी असून ती मूत्राशयाच्या तोंडाजवळ असते. तिचे मुख्य कार्य म्हणजे मूत्रमार्गात संसर्ग होण्यापासून संरक्षण देणे. वय वाढल्यानंतर ही ग्रंथी हळूहळू मोठी होते. ६० वर्षांपर्यंतच्या वयामध्ये सुमारे ५०% पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. वंशपरंपरा, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि जीवनशैलीतील चुकीच्या सवयी यामुळे देखील हि समस्या उद्भवू शकते.
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यावर मूत्राच्या प्रवाहावर परिणाम होतो. वारंवार लघवी लागणे, लघवी करताना त्रास, लघवीचा कमकुवत प्रवाह, मूत्राशय रिकामे न झाल्यासारखे वाटणे. थेंबथेंब लघवी होणे किंवा थांबणे, कधी कधी लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे यामध्ये दिसतात. वेळेत उपचार न केल्यास मूत्राशय, लघवीचा मार्ग व किडनी यावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये मूत्राशयात जळजळ, मूत्रावरोध, मूत्र मार्गात संसर्ग आणि किडनीचे नुकसान होण्याचा धोका संभवतो. शारीरिक तपासणी करून, अल्ट्रासोनोग्राफी किंवा इमेजिंग चाचणी करून डॉक्टर याबाबत निदान करतात. त्यासाठी “युरीन फ्लो टेस्ट”ही केली जाते.
या आजारावर कायमचा उपचार नाही, मात्र औषधांच्या सहाय्याने तो नियंत्रणात ठेवता येतात. औषधांनीही फरक न पडल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. लेझर रीसक्शनसारख्या अत्याधुनिक, कमी हानीकारक शस्त्रक्रिया यासाठी उपलब्ध आहेत. याबाबतची लक्षणे दिसू लागल्यास तत्काळ मूत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य निदान, उपचार व जीवनशैलीत योग्य बदल केल्यास ही स्थिती नियंत्रणात ठेवता येते. याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत याबाबत ओपीडी सुरु असून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर
Mumbai
broken clouds
26.9
°
C
26.9
°
26.9
°
84 %
6.8kmh
76 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°