• अभ्यासिकेमुळे देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील : ना. चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर :
बिंदू चौक येथील जुन्या भाजपा कार्यालयाच्या इमारतीमध्ये स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिका सुरू झाली आहे. या अभ्यासिकेचे उदघाटन रविवारी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक, प्रफुल जोशी, विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरु केलेल्या स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळे देशाला उत्कृष्ट दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील, असा विश्वास उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष अशी दमदार राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणारे माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष वोरा यांच्या नावे मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली. विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही अभ्यासिका नामदार चंद्रकांत पाटील यांची संकल्पना आहे. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका सुरु करण्यात आली असून, त्यामध्ये ३४ उमेदवार अभ्यास करु शकतील, अशी सर्व सुविधा त्यांना लागणार्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांसह उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वर्गीय वोरा यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. संघ परिवारात वाढलेल्या वोरा यांच्याकडं पराकोटीची निष्ठा होती. त्यांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणार्या नव्या पिढीला वोरा यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी व्हावे, यासाठीच ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. त्यातून देशाला चांगले प्रशासकीय अधिकारी मिळतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
खासदार धनंजय महाडिक यांनीही सन २००४ मध्ये आपण जेव्हा लोकसभेची पहिली निवडणूक लढवली त्यावेळी वोरा यांच्या कार्यपध्दतीची तसेच पक्ष निष्ठेची ओळख झाली. ते प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तीमत्व होते. त्यांच्या आठवणी आणि कार्य चिरंतन राहील, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले.
यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, प्रफुल्ल जोशी, मिश्रीलाल जाजू, उदय सांगवडेकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला वोरा यांच्या भगिनी आशा वोरा, प्रा.जयंत पाटील, हेमंत आराध्ये, संगीता खाडे, अमर साठे, संपतराव पवार, राजाराम शिपूगडे, दिलीप मैत्राणी, समीर नदाफ, अॅड. संगीता तांबे, विद्या प्रबोधिनीचे राजकुमार पाटील, नितीन कामत, अमित लवटे, वृंदा सलगर, शिवाली निंबाळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————————-
स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेचे उदघाटन
Mumbai
broken clouds
26.9
°
C
26.9
°
26.9
°
84 %
6.8kmh
76 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°