कोल्हापूर :
गेली ३१ वर्षे डॉ. संजय महिंद यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरून शिवरायांच्या पादुका आषाढी वारीसाठी पंढरपुरात जातात. तेथून पुढे पावनखिंड, पन्हाळा, ज्योतिबा मार्गे हा सोहळा कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला येतो. या पादुकांचे आगमन करवीरनगरीत झाले.
किल्ले शिवनेरीवरून आलेल्या या पादुकांचे रविवारी करवीरनगरीत आगमन झाले. पादुका मंदिरात आल्यानंतर अंबाबाई चरणी पादुका ठेऊन त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी राजेश भोजे, श्रीपूजक अजित ठाणेकर, केदार मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, ऐश्वर्या मुनिश्वर, सचिन ठाणेकर, अनिकेत अष्टेकर, हिंदू एकताचे दीपक देसाई, राजेंद्र करंबे, सचिन पोवार आदी उपस्थित होते.
किल्ले शिवनेरीवरून आलेल्या पादुकांचे करवीरनगरीत आगमन
Mumbai
overcast clouds
26.9
°
C
26.9
°
26.9
°
85 %
6.5kmh
95 %
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°
Sat
28
°