Homeराजकियशक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे

• शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे श्री अंबाबाईला साकडं
कोल्हापूर :
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घालण्यात आले. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात शुक्रवारी मुंबईत बैठक होत आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी त्याचबरोबर शक्तीपीठ विरोधी कृती समितीने मात्र, हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून हा महामार्ग रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडे अंबाबाईला घातले.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी,  पांडुरंगाला साकडे घातल्यानंतर आता करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालण्यात आले. एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला सुबुद्धी द्यावी आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. या मागणीसाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला इंडिया आघाडी आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने साकडे घालण्यात आले.
शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अंबाबाईला साकडे घालण्यात आले. यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा, अशी एकमुखाने मागणी केली.
या आंदोलनात शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि इंगवले, राजू लाटकर, आर. के. पोवार, सचिन चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, अनिल घाटगे, प्रकाश पाटील, तौफीक मुल्लाणी, अजित पोवार, बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, आनंदा बनकर, दता वारके, सागर कोंडेकर, सुयोग वाडकर, ईश्वर परमार, विनायक फाळके, सचिन पाटील, जय पटकारे, उमेश पाडळकर, वैशाली पाडेकर, आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
88 %
5kmh
100 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page