कोल्हापूर :
येथील विवेकानंद महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बी.ए. व बी.कॉम. शाखेतील विद्यार्थ्यांनी लोकसंख्येच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण मांडणी करून वाढीचा समाजावर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकणारे पोस्टर्स सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कैलास पाटील होते. यावेळी डॉ. कैलास पाटील यांनी युवकांमध्ये लोकसंख्यावाढीची समस्या, तिचे दुष्परिणाम व उपाययोजना या विषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्व स्पष्ट केले.
प्रास्ताविक डॉ. संपदा टिपकुर्ले यानी केले. प्रमुख परीक्षक म्हणून सौ. सई पाटील (गृहविज्ञान विभाग) व डॉ. सोमनाथ काळे यांनी ई-पोस्टर्सचे मूल्यमापन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन आश्विनी गीते यांनी मानले. सूत्रसंचालन खतिजा किल्लेदार यांनी केले. याप्रसंगी डॉ. संदीप पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ई-पोस्टर स्पर्धा
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

