Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची निवड
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधील एमबीए व एमसीएच्या ४१ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. विविध कंपनीकडून घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून ही निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक सर्वाधिक ७.२५ लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहे.
यामध्ये जस्ट डायल कंपनीमध्ये ९ विद्यार्थ्यांची तर लोकल मार्टमध्ये १० जणांची निवड झाली आहे. डी मार्ट या नामांकित साखळी संस्थेत ३ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून मनोरमा सोल्युशन्स या नामांकित आयटी सोल्युशन कंपनीत ४ विद्यार्थ्यांची, थरमॅक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेत २ विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे. ॲक्सिस बँक, कॅलिक्स सोल्युशन, राज इम्पोर्ट, सॉफ्टवेंजर, बजाज फिनसर्व या कंपनीमध्येही विविध विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
संचालक डॉ. अजित पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
81 %
4.6kmh
57 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page