कोल्हापूर :
येथील विवेकानंद महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्ष (सचेतना मंडळ) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांच्या आरोग्य व आहार’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनीता वधवानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “Healthy outside starts from healthy inside”, म्हणजेच बाह्य सौंदर्य व आरोग्य हे आपल्या अंतर्गत चांगल्या सवयींवर अवलंबून असते.
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्यासाठी ८०-२० पॅटर्न पाळणे आवश्यक आहे. ८० टक्के योग्य आहार व २० टक्के व्यायाम. त्यांनी महिलांना योग्य आहार पद्धती अंगीकारण्याकरीता आहारात फळे, सुकामेवा, प्रथिने यांचा समावेश करण्याचे आवाहन केले. तसेच अंधानुकरण, जास्त प्रमाणात अस्वास्थ्यदायक पदार्थ, पारंपरिक चुकीच्या रूढी, सोशल मीडियाचा अतिवापर यापासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी महिलांचे आरोग्य आणि आहार या विषयाचे समाजातले महत्व पटवून देत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. पल्लवी देसाई यांनी केले. आभारप्रदर्शन आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी मानले. सूत्रसंचालन सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
विवेकानंद महाविद्यालयमध्ये महिलांचे आरोग्य व आहार विषयावर व्याख्यान
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
80 %
5.3kmh
99 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°