Homeशैक्षणिक - उद्योग महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल 

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल 

कोल्हापूर :
रिलायन्स जिओने मे २०२५ मध्ये महाराष्ट्रात १.६३ लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिओने गेले तीन महिने आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने भर घातली आहे.
यासोबतच इतर टेलिकॉम ऑपरेटर्सने मात्र नाममात्र भर घातल्याचे दिसून येते. ट्राय च्या आकडेवारीनुसार भारती एअरटेल २७१११ तर व्होडा आयडियाने २८००० नवीन ग्राहकांची भर घातली आहे तर बीएसएनएलकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली असून १७००० ग्राहकांनी बीएसएनएलला सोडचिट्ठी दिली आहे.
राज्यात, फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सस क्षेत्रात जिओ आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून, जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या ४७११७० इतकी झाली असून तुलनेत एअरटेलचे १३३२२२ ग्राहक नोंदवले आहेत.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
80 %
5.3kmh
99 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page