कोल्हापूर :
डॉ. प्रथमेश कोटगी व डॉ. समीर जोशी यांनी लेखन केलेल्या ‘आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी – भाग १ व २’ या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ नुकताच फोंडा, गोवा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात आयुर्वेदाचे गूढ, शास्त्रीय व तात्त्विक ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज आणि सरळ भाषेत पोहोचवण्याचा हेतू मांडण्यात आला.
पुस्तकाचे लेखक डॉ. प्रथमेश कोटगी (सहाय्यक प्राध्यापक, स्वस्थवृत्त विभाग, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज) आणि डॉ. समीर जोशी (सहयोगी प्राध्यापक, संहिता व सिद्धांत विभाग, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय, ढवळी-फोंडा) यांनी आपले अनुभव, शास्त्रीय अभ्यास आणि समाजहिताचा दृष्टिकोन या ग्रंथांमधून मांडला आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, तसेच गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. अनुरा बाळे आणि प्रकाशक सौ. प्रियंका जोशी उपस्थित होते.
‘आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी’ ग्रंथाचे प्रकाशन
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.5
°
C
27.5
°
27.5
°
78 %
4.8kmh
99 %
Sat
28
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
29
°