Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी

एनआयटीला अतिउत्कृष्ट श्रेणी

• एमएसबीटीईच्या शैक्षणिक तपासणीतील कामगिरी
कोल्हापूर :
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) च्या मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स-कम्प्युटर आणि एआयएमएल या डिप्लोमा कोर्सेसना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून झालेल्या शैक्षणिक तपासणीत अतिउत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली.
ऑटोमोबाईल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या इतर तीन डिप्लोमा कोर्सेसना एनबीएकडून मानांकन प्राप्त असलेने सदरची शैक्षणिक तपासणी लागू नाही. येथील शिक्षण पद्धती, स्टार्टअप निर्मितीसाठीचे उपक्रम, नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स, औद्योगिक अभ्यास भेटी, अद्ययावत लॅब व वर्कशॉप, डिजिटल ग्रंथालय, विद्यार्थ्यांचा निकाल व अभिप्राय यावर मुल्यांकनात भर देत तपासणी समितीने या विभागांना उच्चतम अशी अतिउत्कृष्ट श्रेणी दिली आहे असे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले.
सध्या डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी-पालकांनी एनआयटीमधील शासनमान्य प्रवेश सुविधा केंद्रात येवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे यांनी केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार व सर्व संचालक यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.9 ° C
27.9 °
27.9 °
78 %
5.3kmh
100 %
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page