कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत) येथील प्रा. संजय पांडुरंग थोरात यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून नुकतीच गणित विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘A STUDY OF SOME GENERALIZATIONS OF LATTICES AND DISTRIBUTIVE LATTICES’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. शिवाजी विद्यापीठ संलग्नित कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी येथील डॉ. संताजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
प्रा. थोरात यांना शिवाजी विद्यापीठाचे गणित विभागप्रमुख डॉ .एम. टी. गोफणे, माजी विभागप्रमुख व विज्ञान अधिष्ठाता प्रा. डॉ. सरिता ठकार, प्रा. के. डी.कुच्चे, प्रा. एस. पी. पाटणकर, माजी गणित विभागप्रमुख, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, महाविद्यालयाच्या आय.क्यु.ए.सी. प्रमुख डॉ. श्रुती जोशी, रजिस्ट्रार एस. के. धनवडे तसेच विवेकानंद कॉलेजमधील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्रा. संजय थोरात यांना पीएच. डी. पदवी प्रदान
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.5
°
C
27.5
°
27.5
°
82 %
8.7kmh
100 %
Tue
28
°
Wed
27
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°