HomeUncategorizedमहाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड

महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड


• केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पदभार प्रदान
कोल्हापूर :

महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था म्हणून कार्य करणार्‍या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध फेरनिवड झाली. केंद्रीय गृह व सहकारीता मंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना प्रेसीडेन्शीअल कप प्रदान करून अध्यक्षपदाचा कार्यभार प्रदान करण्यात आला.
शतक महोत्सव समारोह सुरू झालेल्या वर्षात अध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याचा गौरव प्राप्त करण्यार्‍या ललित गांधी यांच्या पदभार प्रदानप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री उदय सामंत, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून येत्या शंभर वर्षासाठीचे नियोजन करावे व व्यावसायिक कार्यपध्दतीचा अवलंब करावा असे सांगून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा व अनुभवाची शक्ति ही येणार्‍या काळातील विकासासाठी महत्वाची ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र चेंबरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांनी चौथ्यांदा बिनविरोध निवड केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.5 ° C
27.5 °
27.5 °
82 %
8.7kmh
100 %
Tue
28 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular