Homeकला - क्रीडाईगल नाशिक टायटन्स संघाची शानदार सलामी

ईगल नाशिक टायटन्स संघाची शानदार सलामी

मंदार भंडारीची (नाबाद ११२) शतकी खेळी

कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२५ स्पर्धेत सलामीच्या लढतीत मंदार भंडारी (नाबाद ११२धावा) याने झळकवलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाचा ८ गडी राखून पराभव करून शानदार सलामी दिली. मंदार भंडारी याने एमपीएल स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला. याआधी त्याने १४ जून २०२४ मध्ये एमपीएलच्या दुसऱ्या पर्वात शतकी खेळी केली होती.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर बुधवारी (दि.४) स्पर्धेला प्रारंभ झाला. सलामीच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्स संघाने २० षटकात ६ बाद १९४ धावाचे आव्हान उभे केले. सामन्यात पहिल्याच षटकात नाशिकच्या मुकेश चौधरीने रत्नागिरीच्या प्रीतम पाटील (१२धावा)ला झेलबाद करून संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अझीम काझीने ३१ चेंडूत ५ चौकार व २ षटकारासह ४२ धावा केल्या. अझीम व धीरज फटांगरे या जोडीने ५५ चेंडूत ७५ धावा करून संघाचा डाव सावरला. सलामवीर धीरज फटांगरेने ४७ चेंडूत ७ चौकार व ४ चौकारांसह नाबाद ८१ धावांची अफलातून खेळी करून एकाबाजूने संघाची बाजू सांभाळली. धीरजला दिव्यांग हिंगणेकर २०, निखिल नाईक १४, प्रीतम पाटील १२, अभिषेक पवार नाबाद १० यांनी छोटी खेळी करून साथ दिली. नाशिककडून मुकेश चौधरी (३-४३), अक्षय वाईकर (१-२६), प्रशांत सोळंकी (१-३१) यांनी सुरेख गोलंदाजी केली विजयासाठी १९५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाने १८.२ षटकात २ गडी बाद १९५ धावा काढून पूर्ण केले. सलामीची जोडी मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी यांनी ७४ चेंडूत १२२ धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. अर्शिन कुलकर्णी २९ धावा काढून तंबूत परतला. कर्णधार अझीम काझीने त्याला झेलबाद केले. मंदार भंडारीने धडाकेबाज फलंदाजी करताना शतकी खेळी (नाबाद ११२) करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयासाठी नाशिक संघाला ४७ चेंडूत ७३ धावा असे समीकरण होते. मंदार भंडारीची तुफानी खेळी व साहिल पारीख (४६धावा) ची साथ यामुळे हे आव्हान १० चेंडू राखून पूर्ण केले. साहिल पारीखने २२ चेंडूत ४६ धावा करताना ५ चौकार व ३ षटकार खेचले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.8 ° C
28.8 °
28.8 °
80 %
10.1kmh
100 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °

Most Popular