Homeराजकियआगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात : नाम. चंद्रकांतदादा पाटील

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात : नाम. चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर :
आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपा तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. त्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार येत्या महिनाभरात शासकीय दाखले सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी लक्ष्मीपुरी मंडलात नाम. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच लक्ष्मीपुरी मंडलातील कार्यकर्त्यांना अक्कमहादेवी मंडप हॉलमध्ये झालेल्या बैठकीत संबोधित केले.
याप्रसंगी नाम. पाटील म्हणाले की, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्यांना आवश्यक सामाजिक, आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. तसेच आपापल्या परिसरात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे, अशा सामाजिक आणि लोकोपयोगी विविध उपक्रमांसाठी भाजपा सदैव आपल्या पाठीशी असल्याचे नमूद केले. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही संधी जनसेवा म्हणून उपयोगात आणावी असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, शैक्षणिक वर्षाची सुरवात लवकरच होत असून विद्यार्थी आणि पालकांच्या सोईसाठी ही शिबिरे आयोजित करत असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव, प्र. का. सदस्य राहूल चिकोडे, विशाल शिराळकर, धनश्री तोडकर, आप्पा लाड, अतुल चव्हाण, संतोष माळी, विजय दरवान, अवधूत भाट्ये, रश्मी साळोखे, विजयमाला जाधव, आसावरी जुगदार, महेश यादव, मंगला निपाणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती, मोफत उत्पन्न दाखला, मोफत रहिवासी दाखला, मोफत डिजिटल रेशनकार्ड व आधारकार्ड इत्यादी अनेक दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भाजपा कोल्हापूरच्यावतीने शहरातील ८१ प्रभगांत या पद्धतीची शिबिरे होणार असून पहिल्या टप्प्यात दिनांक ३ जून ते १४ जून या कालावधीत २५ ठिकाणी शिबिरांचे आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करणात येत आहे. शिबीराबाबत अधिक माहितीसाठी आपल्या प्रभागातील भाजपा पदाधिकारी किंवा भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०२३१- २५४८१०३ असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page