Homeराजकियकोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे

कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी नूतन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांची मंगळवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता नियम १९८७ मधील नियम तीन नुसार काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. यात काँग्रेसच्या गटनेतेपदी इंद्रजित बोंद्रे यांची एकमताने निवड केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सहआयुक्त चंद्रकांत खोसे व उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत गटाची नोंदणी करण्यात आली.
बोंद्रे हे प्रभाग ८ मधून विजयी झाले असून महापालिकेच्या राजकारणाचा त्यांना पुर्वानुभव आहे. आक्रमक अन अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. आई शोभा बोंद्रे यांनी याआधी महापौरपद भूषवले असून बोंद्रे परिवार गेल्या कित्येक दशकापासून महापालिकेच्या राजकारणावर मांड ठेवून आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन काँग्रेसने त्यांची ही गटनेतेपदी निवड केली आहे.
खासदार शाहू छत्रपती महाराज व काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ३४ नगरसेवक निवडून आले. सत्तेपर्यंत जाण्यासाठी त्यांना काही जागा कमी पडल्या असल्या तरी महापालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मान मिळाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्याठी काँग्रेसने आक्रमक व तरुण चेहऱ्याला बोंद्रे यांच्या रुपाने संधी दिल्याचे मानले जाते.
यावेळी राजेश लाटकर, संजय मोहिते, अर्जुन माने, दुर्वास कदम, प्रतापसिंह जाधव सरकार, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक फाळके, विशाल चव्हाण, जयश्री चव्हाण, स्वाती यवलुजे, रुग्वेदा माने, रुपाली पोवार, दिपाली घाटगे, पुष्पा नरुटे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
56 %
0kmh
64 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page