Homeशैक्षणिक - उद्योग प्रजासत्ताक दिनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श

प्रजासत्ताक दिनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श

• आदर्श विद्या मंदिरमधील ५१ गरजू विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट्सचे वाटप
कोल्हापूर :
नागदेववाडी येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी स्पोर्ट्स किट्स वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, आदर्श विद्यामंदिर, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शाळेतील एकूण ५१ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्पोर्ट्स किट्सचे वाटप करण्यात आले. महेश कुलकर्णी, अमरसिंग राजपूत, पुष्कर बोरगावकर, माधव बोरगावकर, अजय खतकर, श्रावणी खतकर, प्रणाली खतकर व नाना बोरगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना किट्स प्रदान करण्यात आले. यावेळी प्रणाली खतकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली.
खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होण्यासोबतच शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या सामाजिक उपक्रमासाठी अंजली पाठक, शितल महाजनी, प्रसाद बुरांडे, विश्राम कुलकर्णी, ओंकार पोद्दार, महेश कुलकर्णी, संजय हेगिष्टे, उदय हिडदुग्गी, उदय शेळके यांच्यासह दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण व क्रीडा क्षेत्रात हातभार लावणाऱ्या सर्व सहकार्यकर्त्यांचे व दानशूर व्यक्तींचे आभार अजय खतकर व प्रशांत जोशी यांनी मानले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
23.9 °
50 %
2.1kmh
20 %
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °
Mon
27 °

Most Popular

You cannot copy content of this page