• उत्तरेश्वरची झुंजार क्लबवर मात
कोल्हापूर :
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. तत्पूर्वीच्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळने झुंजार क्लबवर ४-२ ने मात केली.
खंडोबा आणि जुना बुधवार यांच्यातील सामना चुरशीचा झाला पण पूर्णवेळेत गोलफलक कोराच राहिला. दोन्ही संघाकडून झालेल्या चढाया वाया गेल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. खंडोबाच्या प्रभू पोवार, शाहीर सिद्दीक, पृथ्वीराज साळोखे, विष्णू टी.एम., रोहित जाधव, स्टॅलिन यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. एका चढाईत झुंजार क्लबच्या वारीस भाटचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर शाहीर सिद्दीकने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक अनिल जानकरने रोखून गोलचे संकट टाळले.
जुना बुधवारकडून रविराज भोसले, सचिन मोरे, प्रथमेश भोसले, ब्रम्हा थुलूंगा, मयूर सुतार, शुभम जाधव यांनी गोलसाठी अटोकाट प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. प्रथमेश जाधवने हेडव्दारा मारलेला चेंडू गोलपोस्टला धडकल्याने गोलची संधी हुकली. अखेर पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
उत्तरेश्वरची झुंजार क्लबवर मात…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वरने झुंजार क्लबवर ४ विरूध्द २ गोलने मात केली. सामना सुरु होताच झालेल्या चढाईत झुंजार क्लबच्या संदेश शिंदेकडून स्वयंगोल झाला. त्यामुळे दुसऱ्या मिनिटाला उत्तरेश्वरला आपसूकच १-०ची आघाडी मिळाली. त्यानंतर झालेल्या चढाईत अझर मोमीनने गोल नोंदवून १६व्या मिनिटाला आघाडी २-० अशी वाढवली. २८ व्या मिनिटाला इलेन्स शर्माने गोल करून आघाडी ३-० अशी भक्कम केली. त्यानंतर जादावेळेत झुंजार क्लबच्या संचित साळोखेने गोल करून आघाडी ३-१ वर आणली. उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी झुंजार क्लबच्या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. त्यामध्ये शुभम पाटीलने गोल केला. ५४व्या मिनिटाला सामना ३-२ अशा स्थितीत आला. उत्तरेश्वरच्या इलेन्स शर्माने जादावेळेत वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल नोंदवून आघाडी ४-२ वर नेली. उर्वरित वेळेत ४-२ची आघाडी कायम राखून उत्तरेश्वरने सामना जिंकून तीन गुण प्राप्त केले.
——————————
आजचे सामने…
• पीटीएम (ब) – सुभाषनगर : दु. १:३० वा.
• दिलबहार – बालगोपाल : दुपारी ४ वा.
——————————
खंडोबा – जुना बुधवार सामना गोलशून्य बरोबरीत
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
23.9
°
50 %
2.1kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

