कोल्हापूर :
जिओ-ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटने बाजारात नवीन इक्विटी फंड सुरू करण्याची घोषणा केली असून या फंडाचे नाव जिओ-ब्लॅकरॉक सेक्टर रोटेशन फंड असे आहे. हा फंड शेअर बाजारातील विविध क्षेत्रांमध्ये (सेक्टर्समध्ये) वेळोवेळी गुंतवणुकीचे प्रमाण बदलत, गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
जिओ-ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जागतिक स्तरावरील आघाडीची गुंतवणूक संस्था ब्लॅकरॉक यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. कंपनीनुसार, हा नवा फंड ब्लॅकरॉकच्या सिस्टेमॅटिक ॲक्टिव इक्विटीज (SAE) या रणनीतीवर आधारित असून, डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत विश्लेषणाच्या मदतीने कोणत्या क्षेत्रात अधिक आणि कोणत्या क्षेत्रात कमी गुंतवणूक करायची, याचा निर्णय घेतला जातो. बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार क्षेत्रीय आघाडी (सेक्टर लीडरशिप) बदलत राहते आणि त्या बदलांचा फायदा गुंतवणूकदारांना मिळावा, हा या रणनीतीचा मुख्य उद्देश आहे. सेक्टर रोटेशन पद्धतीमुळे जोखीम संतुलित ठेवण्यास आणि दीर्घकालीन चांगला परतावा मिळवण्यास मदत होऊ शकते.
जिओ-ब्लॅकरॉक सेक्टर रोटेशन फंडची रचना फ्लेक्सीकॅपसारख्या कोअर इक्विटी गुंतवणुकीला पूरक अशी करण्यात आली आहे. हा फंड वैयक्तिक शेअर्स निवडण्याऐवजी भविष्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे बदलत्या आर्थिक आणि बाजार परिस्थितीत गुंतवणूकदारांना अधिक संधी मिळू शकतात. जिथे फ्लेक्सीकॅप फंड विविध आकारांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, तिथे हा फंड अर्थव्यवस्था आणि बाजाराच्या स्थितीनुसार वेळोवेळी विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचे प्रमाण बदलत राहतो.
जिओ-ब्लॅकरॉकचे मुख्य गुंतवणूक अधिकारी ऋषी कोहली यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत उपभोग, तंत्रज्ञान, भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठे बदल झाले असून, त्यामुळे विविध क्षेत्रांची स्थिती सातत्याने बदलत राहिली आहे. हा फंड गुंतवणूकदारांना या बदलांचा लाभ घेण्याची संधी देईल.
जिओ-ब्लॅकरॉक सेक्टर रोटेशन फंडचा न्यू फंड ऑफर (NFO) 27 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी बंद होईल. हा फंड जिओ फायनान्स अॅप, कंपनीची अधिकृत वेबसाइट तसेच प्रमुख डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून देशभरातील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल.
——————————
जिओ-ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटकडून ‘जिओ-ब्लॅकरॉक सेक्टर रोटेशन फंड’चा शुभारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
42 %
3.1kmh
20 %
Thu
28
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

