कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील (चुयेकर) यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्य प्रतिदिन २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीच्या अमृत कलश पूजन कार्यक्रम गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. या अमृत कलशाचे पूजन गोकुळमध्ये कार्यरत असलेल्या ११ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, मागील वर्षी स्व. आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुण्यतिथीला १८ लाख लिटर दूध संकलनाचे अमृत कलश पूजन केले होते. त्यावेळी २० लाख लिटरचा संकल्प केला होता आणि आज तो यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, गोकुळ दूध संघाचा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विश्वासाच्या बळावरच गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
आ. सतेज पाटील म्हणाले की, आज गोकुळ दूध संघाने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून, ही कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीची, विश्वासाची आणि संघाच्या सक्षम नेतृत्वाची पावती आहे.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळचे माजी चेअरमन स्व. आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गोकुळने प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला, हा क्षण गोकुळ कुटुंबासाठी अभिमानाचा आहे. अवघ्या ७०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला गोकुळचा प्रवास आज कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा आहे. ग्रामीण भागातील दूध शहरी बाजारपेठेत जावे आणि शहरातील पैसा ग्रामीण भागात यावा, ही स्व. चुयेकर साहेबांची दूरदृष्टी होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये गोकुळचे दूध पोहोचले.
या कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले. आभार संघाचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला माजी खासदार निवेदिता माने, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक भैय्या माने, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
——————————
गोकुळतर्फे २० लाख लिटर दूध संकलनपूर्ती कलशाचे पूजन
RELATED ARTICLES
Mumbai
haze
23
°
C
23
°
23
°
73 %
1.5kmh
5 %
Sun
24
°
Mon
24
°
Tue
25
°
Wed
26
°
Thu
25
°

