Homeकला - क्रीडाआंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला तीन कांस्यपदके

आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला तीन कांस्यपदके

कोल्हापूर :
भोपाळ (मध्य प्रदेश) येथील संजीव अग्रवाल विद्यापीठात सुरू असलेल्या साऊथ-वेस्ट विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या महिला संघाने तीन कांस्यपदके पटकाविली. स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण पाचही खेळाडूंची निवड चंदीगड (पंजाब) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली.
निकिता कमलाकर (५८ किलो), राजनंदिनी आमने (६९ किलो), ईश्वरी पवार (७७ किलो), तनुजा पोळ (६३ किलो, चतुर्थ क्रमांक), श्रावणी जाधव (५८ किलो, पाचवा क्रमांक) यांनी यश मिळवले.
या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र -कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र चव्हाण, प्रशिक्षक म्हणून श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
25 ° C
25 °
25 °
69 %
2.1kmh
1 %
Fri
25 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °
Tue
25 °

Most Popular

You cannot copy content of this page