Homeकला - क्रीडाभैय्यासाहेब बावडेकर स्मृतीचषक सेंट झेवियर्स हायस्कूलने पटकाविला

भैय्यासाहेब बावडेकर स्मृतीचषक सेंट झेवियर्स हायस्कूलने पटकाविला

• संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल उपविजेते
कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व नीलराजे पंडित-बावडेकर पुरस्कृत भैय्यासाहेब बावडेकर स्मृतीचषक १६ वर्षाखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत
सेंट झेवियर्स हायस्कूलने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलवर ३८ धावांनी मात करून विजेतेपद पटकाविले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मालिकावीर, सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सेंट झेवियर्सच्या संस्कार पाटील तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून शिवजीत इंदुलकर यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण १२ संघांच्यामध्ये ११ सामने खेळविणेत आले. पीरवाडी येथे सेंट झेवियर्स हायस्कूल व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये अंतिम सामना झाला.
प्रथम फलंदाजी करताना सेंट झेवियर्स हायस्कूलने मर्यादित २३ षटकात सर्वबाद १२७ धावा केल्या. यामध्ये शिवजीत इंदुलकरने ३८, शौर्य मंगेशकरने ३४, संस्कार पाटीलने १३, सुधांशू जाधवने १० धावा केल्या. घोडावत स्कूलकडून गोलंदाजी करताना श्लोक पाटीलने १८ धावात ४ बळी, निल पटेलने २३ धावात ३ तर चैतन्य दीक्षितने २ व तक्षने १ बळी घेतले. अवांतर धावा २३ दिल्या.
उत्तरादाखल खेळताना संजय घोडावत स्कूलचा १७.४ षटकात सर्वबाद ८९ धावा होऊन ३८ धावांनी पराभव झाला. यामध्ये चैतन्य दीक्षितने १६, परम पटेलने १४, निल पटेलने १२, अद्वैत नार्वेकरने ११ धावा केल्या. सेंट झेवियर्स हायस्कूलच्या संस्कार पाटीलने ११ धावात ४ बळी घेतले. समर्थ कापशिकरने २१ धावात ३, शौर्य वर्धनने १ बळी घेतले. अवांतर धावा १७ दिल्या.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ नीलराजे पंडित बावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी केएसएचे फायनान्स व क्रिकेट सेक्रेटरी नंदकुमार बामणे, कार्यकारिणी सदस्य दिपक घोडके, केडीसीएचे सदस्य केदार गयावळ, केएसए क्रिकेट समिती सदस्य प्रतिक जामसांडेकर व पंच उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नंदकुमार बामणे यांनी केले.
             ————-
      विजेता संघ….
शिवजीत इंदुलकर, संस्कार पाटील, श्रीवर्धन आपके, सुधांशू जाधव, ऋग्वेद शेट्टे, शौर्य माणगांवकर, समर्थ कापशिकर, सिद्धाजी गायकवाड, ईशान बिरांजे, शौर्यवर्धन कोळी, अरूयुष चौगुले, समर्थ चव्हाण व प्रशिक्षक ॲलन फर्नांडिस आणि स्वप्निल वांद्रे.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7 ° C
24.7 °
24.7 °
49 %
2.8kmh
0 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

You cannot copy content of this page