कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात येत असलेल्या स्ट्रॉग रुमची प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली.
येत्या १५ जानेवार २०२६ रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. पाहणी कसबा बावडा, लाईन बाजार, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, दसरा चौक शहाजी कॉलेज, यशंवतराव चव्हाण सभागृह, गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन हॉल, राजोपाध्येनगर हॉल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी करुन येथील स्ट्रॉग रुमची पाहणी केली. या ठिकाणी स्ट्रॉग रूमचे नियोजनाबाबत आढावा घेवून स्ट्राँगरुमच्या खिडक्या बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर मतमोजणी संदर्भात नियोजनाबाबतची माहिती घेतली.
मंगळवापासून नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीसाठी शहरात एकूण ५८४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात एकूण ४,९४,७११ मतदार असून त्यामध्ये २,४४,७३४ पुरुष मतदार तर २,४९,९४० महिला मतदार तसेच ३७ इतर मतदारांचा समावेश आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.
——————————
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्टाँग रुमची प्रशासकांकडून पाहणी
Mumbai
broken clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
38 %
2.8kmh
64 %
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

