कोल्हापूर :
कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (कॅनरा रोबेको एएमसी)ने महाराष्ट्र व गोव्यामध्ये ‘निवेश बस यात्रा’ सुरू केली आहे. ज्याअंतर्गत म्युच्युअल फंड गुंतवणूकीबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यात येईल आणि राज्यभरातील गुंतवणूकदारांना शिक्षित करण्यात येईल. या उपक्रमाचा म्युच्युअल फंड गुंतवणूक सोपी करण्याचा आणि राज्यांमध्ये आर्थिक शिक्षण देण्याचा मनसुबा आहे.
एक बस महाराष्ट्रातील पुण्यापासून प्रवासाला सुरूवात करेल, ज्यानंतर नाशिक, संभाजीनगर, जालना, अकोला व नागपूर यांसह प्रमुख ठिकाणांपर्यंत प्रवास करत शहरांमधील निवासींमध्ये जागरूकतेचा प्रसार करेल. दुसरी बस कोल्हापूरमधून प्रवासाला सुरूवात करेल, ज्यानंतर रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे प्रवास करेल आणि गोव्यामध्ये या उपक्रमाचे समापन होईल.
आजच्या आर्थिक क्षेत्रात ज्ञान माहिती इतकेच महत्त्वाचे आहे. माहितीपूर्ण गुंतवणूकदार स्वत:साठी उत्तम निर्णय घेण्यासोबत व्यापक आर्थिक परिसंस्था प्रबळ देखील करतो. आम्ही गुंतवणूकीबाबत माहिती सहजसाध्य व कृतीशील करण्याप्रती कटिबद्ध आहोत, असे कॅनरा रोबेको एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रजनीश नरूला म्हणाले.
निवेश बस यात्रा प्रमुख सामुदायिक ठिकाणांना भेट देईल, जेथे निवासींशी कनेक्ट होईल आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान देईल. साधे प्रात्यक्षिके व डिजिटल टूल्सच्या माध्यमातून या उपक्रमाचा म्युच्युअल फंड्सबाबत गैरसमजांना दूर करण्याचा आणि नियमित, दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करण्याचे फायदे स्पष्ट करण्याचा मनसुबा आहे.
कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनीतर्फे ‘निवेश बस यात्रा’
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
22 %
3.6kmh
16 %
Tue
32
°
Wed
28
°
Thu
27
°
Fri
26
°
Sat
26
°

