Homeशैक्षणिक - उद्योग सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी व ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी व ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर :
आर. एल. तावडे फाउंडेशन, कोल्हापूर संचलित सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्यात शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांची मान्यता आवश्यक आहे. संबंधित सर्व मान्यता प्राप्त झाल्यानंतरच बी.एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कराराचा उद्देश विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य विकास करणे व भविष्यात प्लेसमेंटच्या संधी निर्माण करणे हा आहे, अशी माहिती आर. एल. तावडे फाउंडेशनच्या सेक्रेटरी श्रीमती शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी ॲस्टर आधार हॉस्पिटलचे एम.डी. डॉ. उल्हास दामले, सी.एम.एस. डॉ. अजय केणी, सीओओ डॉ. डॅलॉन फर्नांडिस तसेच आर. एल. तावडे फाउंडेशनच्या सेक्रेटरी श्रीमती शोभा तावडे आणि डायरेक्टर डॉ. अनिलकुमार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आर. एल. तावडे फाउंडेशन ही १९९५ साली नोंदणीकृत संस्था असून ती गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कार्यरत आहे. ह्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथे डिप्लोमा व पदवी स्तरावरील फार्मसी अभ्यासक्रम राबविले जातात. कॉलेजला एमएसबीटीई, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता असून शिवाजी विद्यापीठाशी संलग्नता आहे. कॉलेजला नॅककडून बी++ दर्जा प्राप्त झाला आहे.
ॲस्टर आधार हॉस्पिटल हे ॲस्टर डीएम हेल्थकेअर समूहाचा भाग असून कोल्हापूरातील एक अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. २५० बेड्सचे रुग्णालय, ६० पेक्षा अधिक आयसीयू बेड्स, २४x७ आपत्कालीन सेवा तसेच अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत.
या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना रुग्णालयीन प्रत्यक्ष अनुभव, ट्रेनिंग, इंटर्नशिप व कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी नियोजन करण्यात येणार आहेत.
आर. एल. तावडे फाउंडेशन व ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्यातील हा सामंजस्य करार फार्मसी शिक्षणाला उद्योग व आरोग्यसेवा क्षेत्राशी जोडणारा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
27.9 °
36 %
4.6kmh
6 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
26 °
Sun
27 °

Most Popular

You cannot copy content of this page