कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाला मिळलेले हे ५८वे पेटंट आहे.
प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती थोरात, सूरज संकपाळ व डॉ. अभिषेक लोखंडे यांनी हे संशोधन केले. ‘आरजीओ निकेल कोबाल्ट बेस्ड हाय एनर्जी डेन्सिटी असिमेट्रिक इलेक्ट्रोकेमिकल सुपरकॅपेसिटर डिव्हाइस’ या संशोधनामुळे ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले आहे. ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी व सुपरकॅपेसिटर डिव्हाइस विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. केमिकल बाथ डिपॉझिशन मेथड या सोप्या व कमी खर्चिक प्रक्रियेद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

