कोल्हापूर :
भारतातील नंबर १ फर्निचर ब्रँड असलेल्या रॉयलओक फर्निचरने आपल्या उत्कृष्ट ‘कंट्री स्टोअर’ संग्रहाचे उदघाटन केले. कोल्हापूर – सांगली रोडवरील हालोंडी येथे रॉयलओक फर्निचरने आपले ‘प्रमुख स्टोअर’ सुरू केले आहे.
या स्टोअरचे उदघाटन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रॉयलओक इन्कॉर्पोरेशन प्रा. लि.चे अध्यक्ष विजय सुब्रमण्यम, भारतीय सिंद्धू सभा राष्ट्रीय अध्यक्ष भगीरथ छाबडा, राष्ट्रीय अध्यक्ष, संत निरंकारी मिशन क्षेत्रीय प्रभारी अमरलाल निरंकारी, सिंधी समाज कोल्हापूर उपाध्यक्ष रमेशभाई तनवाणी, आर्किटेक्ट संगीता भांबुरे, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट अध्यक्ष राजेंद्र खंडेराजूरी, क्रिडाई अध्यक्ष के.पी. खोत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच किरण छाब्रिया, थम्मैय्या कोटेरा, अजय शर्मा, अजय दहाके, सचिन संजयकुमार नागदेव, विरेन भरत लखमानी आणि आदित्य भरत लखमानी हे उपस्थित होते.
१५,००० चौरस फूट क्षेत्रफळ व्यापलेल्या या रॉयलओक स्टोअरमध्ये घराच्या प्रत्येक भागासाठी फर्निचरचा विस्तृत आणि मोठा संग्रह उपलब्ध आहे. ज्यात लिव्हिंग रूम्स (बैठकीची खोली), बेडरूम्स, डायनिंग क्षेत्र, स्टडी आणि ऑफिस, आउटडोअर, होम डेकोर, मॅट्रेस (गाद्या) आणि बरेच काही समाविष्ट आहे. कोल्हापूरचे रहिवासी आता आपल्या परिसरातच किफायती दरात उपलब्ध असलेले, स्टायलिश, स्मार्ट आणि उपयुक्त फर्निचरचे विविध प्रकार शोधू शकतात.
याप्रसंगी रॉयलओक फर्निचरचे अध्यक्ष विजय सुब्रमण्यम म्हणाले की, आम्हाला कोल्हापुरात आमचे फ्लॅगशिप स्टोअर उघडताना अभिमान वाटतो आहे. आमची संपूर्ण भारतभर आणि यूएई मध्ये आधीच २०० हून अधिक स्टोअर्स आहेत. हे नवीन उदघाटन आमच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेचे आणि या बाजारपेठेच्या वाढत्या क्षमतेवर असलेल्या आमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. आम्ही येथील आमच्या मौल्यवान ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि उत्कृष्ट सेवा देणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत. कोल्हापूरचे लोक परवडणाऱ्या श्रेणीत उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांसह आपले घर सुसज्ज करण्यास उत्सुक असतील, असे आमचे मत आहे.
——————————————————-
कोल्हापूरात रॉयलओक फर्निचरचे स्टोअर सुरू
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
21
°
C
21
°
21
°
52 %
1.5kmh
0 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
26
°

