कोल्हापूर :
ठाणे येथे राज्यस्तरीय बालगट जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ पाठविण्यात येणार आहे. यासाठीची संघ निवड चाचणी रविवारी (दि.३०) सकाळी ९ वाजल्यापासून, छत्रपती शाहू स्टेडियमवरील कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) जिम्नॅस्टिक हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये नॅशनल ४,५,६,७ लेव्हलचा संघ निवडण्यात येणार आहे. संबंधीत खेळाडू व प्रशिक्षकांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कोल्हापूर जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव संजय तोरस्कर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
रविवारी जिम्नॅस्टिक निवड चाचणी
RELATED ARTICLES
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
65 %
1.5kmh
0 %
Fri
29
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°

