कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालय, तळसंदे येथील ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.
ई.व्ही. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा ऑटो कॉम्प गोशन ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ‘ओ. पी. मोबिलिटी’ कंपनीच्या वतीने महाविद्यालयात आयोजित कॅम्पस ड्राईव्हमधून हि निवड झाली आहे.
अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या १५० विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राईव्हमध्ये सहभाग घेतला होता. विविध चाचण्यामधून यातील ६२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. यात इलेक्ट्रिकल विभागातील ४५ तर मेकॅनिकल विभागातील १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘ट्रेनी इंजीनिअर’ या पदावर या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर मिळाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शोएब तांबोळी यांनी दिली.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. अभिषेक कुंभार, प्रा. शोएब तांबोळी, प्रा.आर. एस. पवार, प्रा. अस्मिता माळी आदी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्रा. मोहसीन बिजली, मॅकेनिकल विभागप्रमुख प्रा. ए. एस. फरास, अकॅडेमिक डीन प्रा. आर. एस. पवार यांच्यासह प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या ६२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
54 %
3.6kmh
1 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

