कोल्हापूर :
संकटातून संकल्पाकडे यानुसार विवेकानंद कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी. विभागामार्फत पूरग्रस्तांना भरीव मदत करण्यात आली होती. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचे हस्ते मॉडर्न कॉलेज, पुणे येथे विवेकानंद कॉलेजचा सन्मान करण्यात आला.
अतिवृष्टीने मराठवाडा विभाग व सोलापूर जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. या परिस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विवेकानंद कॉलेजने पुरग्रस्तबाधित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा दत्तक घेतले. विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान त्याचप्रमाणे समाजाला पुन्हा उभारी देण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी विशेष मेहनत घेतली.
महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने पूरग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार शैक्षणिक साहित्य, कपडे व प्रवास खर्चासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रोख रक्कम, खाद्य पदार्थ व आर्थिक मदतीव्दारे संकलीत करुन दत्तक दिलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे मदत पोहोचवण्यात आली.
महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानामुळे विवेकानंद कॉलेजचा उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत संकटातून संकल्पाकडे या कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, डॉ. संदीप पाटील, डॉ. ए. एस. कुंभार, डॉ. पी. आर. बागडे, डॉ. ए. एस. महात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या उपक्रमासाठी सर्व शिक्षक, प्रशासकीय सेवक, सहा. ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
——————————————————-
पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल विवेकानंद कॉलेजचा सन्मान
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
64 %
2.1kmh
7 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

