कोल्हापूर :
मयूर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कुमुद गयावळ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात सांगलीच्या बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीने सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीवर ४ गडी राखून विजय मिळवला.
भाऊराव पाटील क्रीडांगणावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीने ३८.१ षटकांमध्ये सर्व बाद १३६ धावा केल्या. यामध्ये एस. माने याने ४९ धावा केल्या. बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीकडून समृद्धी गुंडाळ १३ धावांमध्ये ३ बळी, वैष्णवी भंडारे व साक्षी डांगे यांनी प्रत्येकी २ बळी तर एस. गुंडाळ व सायली मोहितेने प्रत्येकी एक बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीने २६.२ षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. यामध्ये साक्षी डांगे ४३, समृद्धी गुंडाळ २२, पियू शहा २० धावा केल्या. सेंचुरियन क्रिकेट अकॅडमीकडून एस. माने २० धावांत ३ बळी, प्रांजल चौगुले १२ धावांत २ बळी तर सुदिक्षा देसाई २४ धावात १ बळी घेतला. अशाप्रकारे बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीने ४ गडी राखून सामना जिंक
बल्लाळेश्वर क्रिकेट अकॅडमीचा सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीवर विजय
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

