कोल्हापूर :
पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात यकृत आणि स्वादुपिंड आजाराच्या निदान आणि उपचारासाठी तसेच लिवर प्रत्यारोपणाबदल तज्ञ सल्ला आणि मार्गदर्शन अपोलो हॉस्पिटल्सने, कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटल सोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे.
अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. रवी शंकर डायरेक्टर, मेडिकल सर्व्हिसेस, डॉ. अमेय सोनवणे, डॉ. केतुल शाह आणि डॉ. अमृत राज यांच्यासह अंतरंग हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. विवेकानंद कुलकर्णी व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आदित्य कुलकर्णी यांनी हा सामंजस्य करार केला आहे. यावेळी डॉ. मनिषा कुलकर्णी उपस्थित होत्या.
अंतरंग हॉस्पिटल हे पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. याच अंतरंग हॉस्पिटलमध्ये आता अपोलो हॉस्पिटल्समधील तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम यकृत आजारावरील सल्ला- मार्गदर्शन आणि उपचारासाठी उपलब्ध असणार आहे.
या उपक्रमातून अपोलो हॉस्पिटल्सचे यकृत तज्ञ, गॅस्ट्रोअँटेरोलॉजिस्ट आणि प्रत्यारोपण सर्जन, आठवड्याला कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटलमध्ये लिवर ओपीडी चालवतील. त्यातून रुग्णांना गरजेनुसार यकृत प्रत्यारोपण पूर्व आणि प्रत्यारोपणानंतर आवश्यक समुपदेशन, तपासणी आणि उपचार मिळतील. त्यासाठी रुग्णांना कोणत्याही महानगरात जाण्याची गरज भासणार नाही. त्यातून रुग्णांना वेळेवर सल्ला, मार्गदर्शन आणि उपचार मिळेल. शिवाय रुग्ण आणि नातेवाईक यांचा वेळ आणि पैसा यामध्ये बचत होईल.
अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईतील वैद्यकीय सेवाचे संचालक डॉ. रवी शंकर म्हणाले की, आजाराची लक्षणे बऱ्याचदा सुरुवातीला दिसत नाहीत, मात्र प्रगत अवस्थेत गंभीर लक्षणे दिसून येतात. कोल्हापूरमधील स्पेशालिस्ट ओपीडीद्वारे आणि अंतरंग’मध्ये गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी असलेल्या शस्त्रक्रियांच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना वेळेवर, तज्ज्ञांकडून सखोल मूल्यांकन आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहोत.
डॉ. विवेकानंद कुलकर्णी म्हणाले की, अपोलो हॉस्पिटल्स आणि अंतरंग हॉस्पिटल मधील भागीदारी ही महानगरातील प्रगत वैद्यकीय सेवा, कोल्हापूर आणि आसपासच्या शहरांमध्ये तत्परतेने पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यातून वेळेवर उपचार मिळवून गंभीर यकृत विकारांवरील परिणाम अधिक चांगले मिळतील. अपोलो हॉस्पिटल्स आणि अंतरंग हॉस्पिटल यांच्या या उपक्रमामुळे दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा, शेवटच्या रुग्णापर्यंत वेळेवर मिळावी, या ध्येयाला अधिक बळकटी मिळणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्सचा कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार
Mumbai
smoke
22
°
C
22
°
22
°
43 %
3.1kmh
6 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

