Homeकला - क्रीडा‘बाई तुझ्यापायी’ मालिका शुक्रवारपासून ZEE5 वर

‘बाई तुझ्यापायी’ मालिका शुक्रवारपासून ZEE5 वर

कोल्हापूर :
ZEE5 ची आगामी मराठी ओरिजिनल मालिका ‘बाई तुझ्यापायी’ धैर्य, शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याच्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा रंगवत आहे. सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाई तुझ्यापायी’ मालिका शुक्रवार (दि.३१) पासून ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत, अशी माहिती निपुण धर्माधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साजिरी जोशी व क्षिती जोग उपस्थित होत्या.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले की, १९९० च्या दशकातल्या काल्पनिक ‘वेसाच्या वाडगाव’ या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा अहिल्या (साजिरी जोशी) या तरुण मुलीची आहे- जी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते आणि परिवर्तनाची ज्योत संपूर्ण समाजात पेटवते. ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका ३१ ऑक्टोबर रोजी फक्त ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी म्हणाले, “‘बाई तुझ्यापायी’ ही एक सर्वमान्य कथा आहे. मुलगी मोठी होत असताना तिच्या शरीरात बदल घडतोच, पण त्याचबरोबर समाजात तिच्यावर अनेक बंधने लादली जातात. या कथेतली नायिका या बंधनांचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करते – ही बंधने खरंच आवश्यक आहेत का, की स्त्रियांना नियंत्रित ठेवण्याचं आणखी एक साधन आहेत?
क्षिती जोग म्हणाल्या की, माझं पात्र एका आईचं आहे, जी परंपरा आणि परिवर्तन यांच्या मध्ये अडकलेली आहे. ती मुलीवर मनापासून प्रेम करते, पण तिच्या मनात रुतलेल्या सामाजिक गोष्टींपासून स्वतःला मुक्त करणं तिच्यासाठी कठीण असतं. हीच गोष्ट ‘बाई तुझ्यापायी’ला सर्वांसाठी लागू बनवते. या मालिकेचा भाग होण्याचा मला अभिमान आहे.
साजिरी जोशी, जी मालिकेत अहिल्याची भूमिका साकारते, म्हणाली की, अहिल्या साकारणं माझ्यासाठी आयुष्य बदलणारं ठरलं. ती फक्त एक पात्र नाही – ती प्रत्येक मुलगी आहे जिला सांगितलं गेलं आहे की ‘तू हे करू शकत नाहीस. प्रेक्षकांना मी विनंती करते की त्यांनी अहिल्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहावं – तिचं धैर्य, तिचा विश्वास आणि शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
33 %
4.1kmh
20 %
Sun
30 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page