Homeसामाजिकतावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार

तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार

• नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटीचा निधी जाहीर : आ. राजेश क्षीरसागर
कोल्हापूर :
शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यात येणार आहे. या प्रवेशद्वारासाठी आराखडा तयार करण्यात यावा. या कमानीच्या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला असून, तीन कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझड झालेली आहे. तसेच सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे. या कमानीतून हजारो वाहने ये-जा करतात, त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत सदर कमानीची पाहणी केली.
यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी, सदरच्या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता सदर कमान पूर्णपणे उतरवून घेणे आवश्यक असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये ही कमान उतरवून घेण्यात यावी. तसेच शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनसाठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी, पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वाराचे डिझाईन करण्यात यावे. सदर प्रवेशद्वार तावडे हॉटेलजवळ उभारण्यात येणार असल्याने जागा देखील मोठी मिळेल. या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला असून, तीन कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी हा विषय ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवला, त्यांचे अभिनंदन आ. राजेश क्षीरसागर यांनी केले.
या पहाणी दरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, स्ट्रक्चरल ऑडिटर श्री. हडकर, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
25 ° C
25 °
25 °
69 %
0kmh
0 %
Sun
26 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page