Homeशैक्षणिक - उद्योग निसर्ग रक्षणासाठी वन्यजीवांचे संरक्षण अपरिहार्य : कमलेश पाटील

निसर्ग रक्षणासाठी वन्यजीवांचे संरक्षण अपरिहार्य : कमलेश पाटील

कोल्हापूर :
निसर्गाचे सौंदर्य टिकवायचे असेल, तर वन्यजीवांचे संरक्षण अपरिहार्य आहे. प्रत्येक तरुणाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वतःची आहे असे समजून कृती करावी, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यानी केले. तळसंदे येथील डी. वाय. पाटील बी. टेक. अ‍ॅग्री महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
महाविद्यालयात १ ते ७ ऑक्टोबर कलावधीत वन्यजीव सप्ताह संपन्न झाला.  सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील (कोल्हापूर) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे (करवीर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅम्पस डायरेक्टर आणि प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य इंजि. पी. डी. उके आणि प्रा. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कमलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना, वन्यजीव संरक्षणासाठी संसाधन व्यक्ती म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी अन्नसाखळी संतुलित ठेवण्याचे महत्त्व सांगून वन्यजीवांचे नोंदवही ठेवण्यास प्रोत्साहित केले. ‘रेड डेटा बुक’ विषयी माहिती देऊन त्यांनी जिम कॉर्बेट यांची पर्यावरण विषयक पुस्तके वाचण्याचा आग्रह धरला.
वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांनी आपले व्यावहारिक अनुभव सांगितले. वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणणारे घटक व संकटे थांबवण्यासाठी समाजाचा सक्रीय सहभाग आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले. त्यांनी वन्यजीव संरक्षणाच्या कार्यात वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीचे सुरक्षा प्रमुख व वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी सादरीकरणाद्वारे कोल्हापूर व महाराष्ट्राच्या वन इतिहासाची माहिती दिली. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या वन्यजीव संवर्धनावरील दृष्टीकोन, ‘शिवआरण्य’ येथे भारतात हत्ती संवर्धनाची सुरुवात, तसेच भारतातील वन्यजीव अभयारण्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नम्रता शिंदे यांनी केले. संदीप पाटील यांनी नियोजन व समन्वय केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
26.9 °
57 %
3.6kmh
0 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page