Homeशैक्षणिक - उद्योग दिवाळी साजरी करा, जिओ भारत मोबाईलसह

दिवाळी साजरी करा, जिओ भारत मोबाईलसह

• फक्त ₹६९९ पासून किंमतीत उपलब्ध
कोल्हापूर :
रिलायन्स जिओने ‘२जी मुक्त भारत मोहिमे’अंतर्गत महाराष्ट्रातील ग्राहकांना २जीवरून ४जीवर अपग्रेड करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या दिवाळीत जिओ भारत मोबाइल फोन अत्यंत परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असून त्यांची सुरुवातीची किंमत फक्त ₹६९९ आहे. कंपनीचे उद्दिष्ट राज्यांतील १ कोटीहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आहे, जे अजूनही २जी नेटवर्कचा वापर करत आहेत. जिओ केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञानावर कार्य करते आणि डिजिटल इंडियाच्या रोडमॅपला पुढे नेत आहे.
महाराष्ट्रामध्ये जिओ भारत व्ही४ मॉडेल झपाट्याने लोकप्रिय होत आहे, कारण त्याचे मासिक रिचार्ज सर्वात किफायतशीर आहे. ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लानसाठी फक्त ₹१२३ द्यावे लागतात. या प्लानमध्ये १४ जीबी डेटा आणि अमर्याद कॉलिंगचा समावेश आहे. तर इतर टेलिकॉम कंपन्यांचे प्लान ₹१९९ पासून सुरू होतात, ज्यात केवळ २ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे जिओ भारतचा रिचार्ज सुमारे ३८ टक्क्यांनी स्वस्त आहे. जिओ भारतचा वार्षिक प्लान देखील उपलब्ध असून त्यासाठी ग्राहकांना फक्त ₹१२३४ द्यावे लागतात.
जिओ भारत फोन केवळ स्वस्त इंटरनेट पुरवतो असे नाही, तर तो मनोरंजन आणि दैनंदिन गरजांचीही पूर्तता करतो. ग्राहकांना जिओ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन, जिओ सावनवरील ८ कोटीहून अधिक गाण्यांचा आनंद आणि जिओ टीव्हीवरील ६०० हून अधिक चॅनेल पाहण्याची सुविधा मिळते. त्यासोबतच जिओ पेच्या माध्यमातून ग्राहक सहजपणे यूपीआय व्यवहार करू शकतात. व्यापारी आणि दुकानदारांसाठी जिओकडून मोफत पे साउंड बॉक्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28 ° C
28 °
25.9 °
36 %
4.6kmh
20 %
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page