Homeशैक्षणिक - उद्योग परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे : प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार

परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे : प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार

कोल्हापूर :
परीक्षा विभाग हा स्वायत्त महाविद्यालयाचा आत्मा असतो. विद्यार्थ्यांचे ज्ञान तपासण्याचा मार्ग म्हणजे परीक्षा होय.  त्यामुळे परीक्षेचे कामकाज अत्यंत पारदर्शकपणे पार पाडणे आवश्यक आहे. महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविण्यासाठी शिक्षकांनी सतत सजग असणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेचे गांभीर्य जपून विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. ते अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि परीक्षा विभाग आयोजित प्रशिक्षण शिबीरात ‘परीक्षा व्यवस्थापन ; शिक्षकांची जबादारी’ या विषयावर बोलत होते.
शिबिराच्या प्रथम सत्रात विवेकानंद कॉलेजचे परीक्षा नियंत्रक डॉ. जी. जे. नवाथे यांनी परीक्षा कामकाजाविषयी मार्गदर्शन करताना प्रश्नपत्रिकांचे स्वरुप हे ज्ञानात्मक, बोधात्मक आणि उपयोजनात्मक असे असावे. विवेकानंद कॉलेज हे स्वायत्त असल्याने परीक्षेच्या संदर्भातील कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे परीक्षेचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्याने परीक्षा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेचे काम सुरु होत नाही तर विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून परीक्षा विभागाचे काम सुरु होते, असे मत मांडले.
परीक्षा उपनियंत्रक डॉ. दीपक तुपे यांनी प्रश्नपत्रिका तयार करताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. परीक्षा कामकाज करीत असताना गोपनीयता, पारदर्शकता आणि पावित्र्य या तीन गोष्टी जपल्या पाहिजेत. प्रश्नपत्रिका तयार करताना ब्लूम टेक्सॉनॉमी या सिध्दांताचा वापर करायला हवा, असे सांगितले.
विवेकानंदचे परीक्षा नियोजन प्रमुख प्रा. एच. व्ही. चामे यांनी पर्यवेक्षकांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करताना, पर्यवेक्षकांनी वेळेत उपस्थित राहणे, विद्यार्थी उपस्थिती व्यवस्थित भरणे, पर्यवेक्षकांनी वर्गात सतत फिरते राहून वर्गावर नियंत्रण ठेवणे, वर्गात स्वत: मोबाईलचा वापर न करणे, कॉपीमुक्त परीक्षा घेणे गरजेचे आहे, असे मत मांडले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात मध्यवर्ती मुल्यमापन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी, परीक्षेचे मूल्यमापन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. उमेश दबडे यांनी उत्तरपत्रिकांची छायाप्रत आणि गुण पडताळणी या विषयावर मार्गदर्शन केले. कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. सिध्दार्थ कट्टीमनी यांनीही मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. तर आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले.  सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले.  या शिबीरास महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
29.9 °
45 %
3.1kmh
0 %
Sun
29 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page