Homeशैक्षणिक - उद्योग सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

कोल्हापूर :
बेलेवाडी काळम्मा येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्र सरकारने साखरेची एम.एस.पी. प्रति क्विंटलला रु. ४, ३०० करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले की, चालू म्हणजेच सन २०२५-२६  हा हंगाम सरकारच्या आदेशानुसार दिलेल्या वेळेत सुरू करू. कारखान्याच्या सहवीज प्रकल्पामधून या हंगामात एकूण ११ कोटी युनिट्स वीजनिर्मिती करून त्यापैकी आठ कोटी युनिट्स वीज निर्यात करण्याचा कारखान्याचा संकल्प आहे. डिस्टलरीमधून रेक्टिफाइड स्पिरिट व इथेनॉल, असे एकूण तीन कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. तसेच;  कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दोन पगार म्हणजेच १६.६६ टक्के बोनस १२  ऑक्टोबर २०२५ रोजी जमा केला जाणार आहे. यावर्षी पाऊसमान चांगले झाल्यामुळे ऊस उपलब्धताही योग्य प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपसाठी कारखान्याकडे पाठवावा,  असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
34 ° C
34 °
29.9 °
17 %
3.6kmh
1 %
Wed
34 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page