Homeकला - क्रीडाजलज सक्सेना महाराष्ट्र क्रिकेट संघात

जलज सक्सेना महाराष्ट्र क्रिकेट संघात

• महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची घोषणा
कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने अनुभवी ऑलराऊंडर जलज सक्सेनाला महाराष्ट्र क्रिकेट संघात सामील केल्याची घोषणा केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, डायरेक्टर ऑफ क्रिकेट शॉन विल्यम्स व सीईओ अजिंक्य जोशी यांच्या उपस्थितीत जलज सक्सेनाला महाराष्ट्र क्रिकेट संघाची जर्सी प्रदान करून औपचारिक घोषणा करण्यात आली.
जलज सक्सेना हा भारतातील डोमेस्टिक क्रिकेटमधील एक अत्यंत गुणी आणि कामगिरीसिद्ध ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यांच्या कारकिर्दीची खासियत म्हणजे त्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, जी अनेक क्रिकेट तज्ज्ञांकडून कौतुकास पात्र ठरली आहे. त्यांच्या डोमेस्टिक क्रिकेट कारकिर्दीत जलज सक्सेनाने ९,००० हून अधिक धावा आणि ६०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. हे आकडे त्याच्या अष्टपैलू खेळ कौशल्याचे द्योतक आहेत. विशेष म्हणजे, रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी ६,००० हून अधिक धावा केल्या असून ४०० पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या आहेत. भारतात रणजी ट्रॉफी आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अशी अष्टपैलू कामगिरी करणारे ते पहिले आणि एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या खेळाची ताकद फक्त बेंटिंग आणि बॉलिंगपुरती मर्यादित नसून, मैदानावरील त्यांचा समज, रणनीती, दबावाखाली खेळण्याची क्षमता आणि नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा दृष्टिकोन यामुळे संघासाठी ते एक अमूल्य ॲसेट ठरले आहेत.
यावेळी रोहित पवार यांनी सांगितले की, जलज सक्सेना हे अत्यंत गुणवान आणि अनुभवसंपन्न खेळाडू आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धा व डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी ही अभूतपूर्व आहे. ते भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र संघातील नवोदित खेळाडूंना निश्चितच होईल. त्यांच्या सामील होण्यामुळे महाराष्ट्र संघ आणखी सामर्थ्यशाली बनला आहे. मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने त्यांचे महाराष्ट्र संघात मनःपूर्वक स्वागत करतो व त्यांच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करतो. आम्हाला विश्वास आहे की त्यांचे संघात सामील होण्यामुळे संघाची कामगिरी अजून चांगली होईल.
जलज सक्सेनाने सांगितले की, महाराष्ट्र संघात सामील होऊन मला अत्यंत अभिमान वाटत आहे. महाराष्ट्र क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे आणि मी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, अंकित बावणे या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
26 ° C
26 °
25.9 °
89 %
1.5kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page