Homeसण - उत्सवतब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसांची झिम्मा-फुगडी स्पर्धा १६ सप्टेंबरला

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसांची झिम्मा-फुगडी स्पर्धा १६ सप्टेंबरला

कोल्हापूर :
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था, भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १६व्या वर्षी मंगळवारी (दि. १६) महासैनिक दरबार हॉल येथे झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
गेल्या १२ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षीही होणार्‍या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसर्‍या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसर्‍या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच ५०१ रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.  नेहमीच्या दिनचक्रात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधींकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ०२३१- २६२५५७७ किंवा ९०७५२१७७८८ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ. अरुंधती महाडिक यांनी केले. यावेळी सौ. वैष्णवी महाडिक, सौ. मंजिरी महाडिक उपस्थित होत्या.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
29 ° C
29 °
28.9 °
84 %
3.1kmh
75 %
Wed
29 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page