• डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘दीक्षारंभ’ उत्साहात
कोल्हापूर :
नवतंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान कोणतेही नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून नव संशोधन व विविध कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ स्वागत समारंभात ते बोलत होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा ‘दीक्षारंभ’ बुधवारी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक प्रा. अभय जोशी, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजीत मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. अश्विन देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ९८.55 पर्सेंटाईल मिळवून डाटा सायन्सला प्रवेश घेणाऱ्या सिद्धी राजपूत हिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित पाटील यांनी केले. कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना आणि विस्तार याची माहिती दिली. याप्रसंगी काही पालकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रा. डॉ. अजित पाटील यांनी सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कार्याचा व महाविद्यालयाच्या शैक्षणिक नियोजनाचा आढावा मांडला. याप्रसंगी डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. उमराणी जे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. मारुती देवकर, रुधीर बारदेस्कर, महाविद्यालय विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह बाराशेहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मारुती देवकर यांनी केले तर आभार अभिजीत मटकर यांनी मानले.
बुद्धी आणि कौशल्यांच्या जोरावर यश नक्की : कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा
RELATED ARTICLES
Mumbai
mist
29
°
C
29
°
28.9
°
84 %
3.1kmh
75 %
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°