Homeसामाजिकशहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

• सी व डी वॉर्डला दैनंदिन पाणीपुरवठा
कोल्हापूर :
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. सदर पंप कार्यान्वित होईपर्यंत पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड तसेच सलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कोल्हापूर महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ए व बी वॉर्ड मध्ये गुरुवार, दि. २८ ऑगस्टपासून ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. या अंतर्गत पुईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी परिसर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधीनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, आयटीआय परिसर, जोगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडापार्क आदी सर्व परिसरांचा समावेश आहे.
ई वॉर्डमध्ये शुक्रवार, दि. २९ ऑगस्टपासून ई वॉर्डात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी १ली ते १३वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूपुरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत आदी परिसरांचा समावेश आहे. तसेच सी व डी वॉर्डला मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहील. तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
         ————–
महापालिकेमार्फत टँकर व्यवस्था…
ज्या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी कळंबा फिल्टर हाऊस- गणेश लोखंडे (मो. ९७६६३६०५०६), बावडा फिल्टर हाऊस- संभाजी पाटील (मो. ९८४४८८४४६०) यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
22 ° C
22 °
22 °
60 %
1.5kmh
0 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page