कोल्हापूर :
कंपनी सेक्रेटरी हे एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र आहे. वाणिज्य विभागातील अनेक रोजगाराच्या संधीमधील एक क्षेत्र म्हणजे कंपनी सेक्रेटरी. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ सनदी लेखापाल (सी.ए.) व बँन्कीग क्षेत्र, स्पर्धा परीक्षा यामध्येच नोकरीच्या संधी न शोधता कंपनी सेक्रेटरी यामध्येही करिअर करण्यासाठीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहावे, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विवेकानंद कॉलेजमधील आय.क्यु.ए.सी. , वाणिज्य विभाग तसेच करिअर कौन्सीलींग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी सी. एस. जयदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना, कंपनी सेक्रेटरी होण्यासाठीच्या अभ्यासक्रमाची माहिती देऊन या क्षेत्रातील कायद्या विषयीची थोडक्यात माहिती दिली. तसेच कंपनी सेक्रेटरी कंपनीच्या दृष्टीने करीत असलेल्या विविध कार्यांबद्दलची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला.
यावेळी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी कॉलेजने आयोजित केलेल्या अशा विविध नोकरी विषयी व व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा व आपले भविष्य घडवावे, असे सांगितले.
आभारप्रदर्शन अमित कुमार यांनी केले. कार्यक्रम आयोजनासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी आणि प्रा. सौ. शिल्पा भोसले यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. ए. एल. मोहिते, डॉ. वाय. बी. माने, डॉ. यू. डी. दबडे व ज्युनिअर, सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
——————————————————-
कंपनी सेक्रेटरी एक रोजगाराचे उत्तम क्षेत्र : कौस्तुभ गावडे
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
31.9
°
23 %
4.1kmh
0 %
Mon
30
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

