कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेजमध्ये ७९वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते कॉलेजच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड संचलन सादर केले.
यावेळी संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य विरेन भिर्डी, प्राचार्य धनराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित केलेल्या समारंभात विवेकानंद कॉलेजमधील सेवानिवृत्त कर्मचारी, पुस्तक लेखक, नेट, सेट, पीएच.डी. पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच बी.ए.भाग १ मधील विद्यार्थिनी प्राजक्ता गायकवाड हिला वैद्यकीय उपचारासाठी प्रा. डॉ. संजय लठ्ठे यांच्याकडून रुपये ११००० चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. विकास जाधव, मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, प्रा. संतोष कुंडले, प्रा. एस. पी. थोरात, डॉ. ई. बी. आळवेकर, प्रा. सौ. शिल्पा भोसले, प्रा. एम. आर. नवले, रजिस्ट्रार एस. के. धनवडे आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी केले.
यावेळी संस्था परिसरातील डॉ.बापूजी साळुंखे इंजिनिअरींग कॉलेज, डॉ. बापूजी साळुंखे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
84 %
4.2kmh
96 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°