Homeकला - क्रीडादेवल क्लबच्यावतीने शशांक मक्तेदार यांच्या राग मैफिलीचे आयोजन

देवल क्लबच्यावतीने शशांक मक्तेदार यांच्या राग मैफिलीचे आयोजन

कोल्हापूर :
सप्तक, बेंगळूरू व गायन समाज देवल क्लबच्या सहसंयोजनाने गोवा येथील ख्यातकीर्त शशांक मक्तेदार यांच्या गान मैफिलीचे आयोजन सप्तक, बेंगळूरू व गायन समाज देवल क्लबच्या संयुक्त विद्यमाने संध्याराग ही संकल्पना घेऊन करण्यात आले आहे.
शशांक मक्तेदार यांच्या गान मैफिल  शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गायन समाज देवल क्लबच्या बाळासाहेब घाटगे कलादालन (तिसरा मजला) येथे संपन्न होणार आहे. या गान मैफिलीमध्ये त्यांना तबला व संवादिनीची साथ अनुक्रमे उदय कुलकर्णी व सुधांशू कुलकर्णी करणार आहेत.
शशांक यांचे सुरुवातीचे सांगीतिक शिक्षण कै. नाथ नेरळकर, औरंगाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी पं. उल्हास कशाळकर यांचेकडे आयटीसी संगीत रिसर्च अकादमी येथे झाले. आकाशवाणीचे ए ग्रेड कलाकार असलेल्या शशांक यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना संगीतातील डॉक्टरेट या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सवाई गंधर्व महोत्सव पुणे, आयटीसी संगीत संमेलन, दिल्ली, कोलकाता, मुंबई, बेंगळूरू तसेच विष्णू दिगंबर जयंती समारोह, दिल्ली येथे आपला गायनाविष्कार सादर करण्याची संधी मिळाली आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या गान मैफिलीसाठी सर्व संगीतप्रेमी रसिकांना मुक्त प्रवेश आहे. तरी संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सप्तक बेंगळूरूचे समन्वयक जी. एस. हेगडे व देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
79 %
6.2kmh
100 %
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page