कोल्हापूर :
स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये २५४ कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांना सादर केला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
प्रस्तावात म्हंटले आहे की, इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्याने सक्षम पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. या प्रस्तावात १०० टीपीडी बायो- सीएनजी प्रकल्प, ५० टीपीडी ऑप्टिकल सॉर्टिंग एमआरएफ, बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प, वस्त्रोद्योग व धोकादायक कचरा व्यवस्थापन, इलेक्ट्रिक वाहनाद्वारे घर-घर कचरा संकलन, प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल मॉनिटरिंग, जनजागृती मोहिमा, विकेंद्रित कंपोस्टिंग व शहर सौंदर्यीकरण यांचा समावेश आहे.निधी उभारणीसाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य,१५ व्या वित्त आयोगाचे अनुदान, पीपीपी पद्धतीने गुंतवणूक व कार्बन क्रेडिट महसूलाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे १००% स्रोतावर कचरा विभागणी, सर्व कचऱ्याची वैज्ञानिक प्रक्रिया, पुनर्वापरातून महसूल, आणि “कचरा-मुक्त शहर” दर्जा मिळवण्याचे उद्दिष्ट आहे.
————–
कचरा-मुक्त शहर हा उपक्रम राबवून इचलकरंजीला स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवता येईल तसेच आरोग्य, पर्यावरण व नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल.
– खासदार धैर्यशील माने
इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी ₹२५४ कोटींचा प्रस्ताव : खा. माने
Mumbai
overcast clouds
26.3
°
C
26.3
°
26.3
°
86 %
5.5kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
28
°