कोल्हापूर :
विवेकानंद महाविद्यालयामधील बी.बी.ए व एम.बी.ए. विभागप्रमुख प्रा. विराज विजय जाधव यांनी डिझाईन केलेल्या एआय अनेबल्ड पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर व एआय अनेबल्ड पोर्टेबल एअर प्युरिफायर या उपकरणांच्या डिझाइनच्या संशोधनासाठी भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
एआय अनेबल्ड पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर – कुटुंबातील एखादा रुग्ण व्हेंटिलेटरवर ठेवल्यावर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ठेवणे हे खर्चाचे व जिकिरीचे होते. अशावेळी पोर्टेबल इमर्जन्सी व्हेंटिलेटर मुळे तुम्ही एखाद्या रुग्णाला घरच्या घरी व्हेंटिलेटरची सुविधा देऊ शकता.
एआय अनेबल्ड पोर्टेबल एअर प्युरिफायर उपकरण – सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या काळात श्वसनाचे विकार होत आहेत. असे असताना हवेतील प्रदूषणाच्या एक्यूआय एअर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे हवा शुद्ध करण्याचे काम हा एअर प्युरिफायर करतो. लहान आकारामुळे सोबत घेऊन कुठेही त्याचा वापर करू शकता.
या संशोधन कार्यामध्ये प्रा. विराज जाधव यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सीईओ कौस्तुभ गावडे आणि विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रा. विराज जाधव यांच्या दोन उपकरणांना भारत सरकारकडून पेटंट मंजूर
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1
°
C
27.1
°
27.1
°
84 %
4.2kmh
96 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°