कोल्हापूर :
मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोल्हापूर सिटीझन फोरमतर्फे आनंदोत्सव साजरा करून साखर-पेढे वाटप करण्यात आले. यावेळी ‘हम सब एक है’, ‘पक्षकार, नागरिक, वकील एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सिटीझन फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद जाधव कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीसाठी गेली २० वर्षे मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन खंडपीठाची मागणी करत होते. मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापूरात मंजूर झाल्याची वार्ता समजताच सिटीझन फोरमतर्फे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी सर्व कोल्हापूरकरांना धन्यवाद दिले. त्यांच्या पाठबळाने फोरमने २० वर्षे सातत्यानने विविध पातळ्यांवर आंदोलनं करून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यात संर्पकयात्रा करून मुंबईमध्ये जाऊन लढा दिला त्याला आज यश आले, अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्रसाद जाधव, वैभवराज राजेभोसले, दिलीप देसाई, उदय लाड, प्रकाश सरनाईक, राजेंद्र थोरवडे, राजू जाधव, सुभाष सुर्वे, रवी पाटील, दिपक जामने, बाजीराव नाईक, गौरव लांडगे, विनायक राव, निवास ब्रम्हपुरे, किशोर डवंग, शुभम चव्हाण, शुभम तिवारी, गजानन सातपुते आदींसह महिलाभगिनीही उपस्थित होत्या.
सिटीझन फोरमतर्फे आनंदोत्सव
Mumbai
broken clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
80 %
3.9kmh
84 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°