Homeशैक्षणिक - उद्योग संविधान दिनानिमित्त आ. गावडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना संविधान प्रस्ताविकेचे वाटप

संविधान दिनानिमित्त आ. गावडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना संविधान प्रस्ताविकेचे वाटप

कोल्हापूर :
संविधान दिनानिमित्त राजारामपुरी शाहूनगर येथील लोकमान्य विद्यालयामध्ये शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासह लोकशाही मूल्यांची रुजवण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. सिद्धार्थ घोडेराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचा अर्थ व महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अमूल्य योगदान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील मूल्ये जपण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शेवडे, अर्चना कदम, गोविंद दुलेवाड, अक्षय कांबळे, अथर्व नागवेकर, ऋषी गायकवाड यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
31 °
28.9 °
54 %
3.1kmh
18 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page